वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सिने सम्राट रायगड लघुपट महोत्सव हा एक प्रयास आहे... सिने निर्मितीकडे एक करियर ऑप्शन म्हणून बघू इच्छिणार्‍या रायगडच्या स्थानिक प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्याचा, त्यांना या क्षेत्रासाठी मार्गदर्शन करण्याचा, आणि त्यांच्यातील टॅलेंटला व्यावसायिक स्तरावर प्रकाशझोतात आणण्याचा.

रायगड जिल्ह्यात निवास करणारे कुणीही सिने सम्राट रायगड लघुपट स्पर्धेत नोंदणी करू शकतात.

प्रत्येक सहभागीला योग्य भूमिका आणि विभाग नेमून दिलेला असावा.
  • उदाहरणार्थ - अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, संपादक वगैरे.
  • प्रत्येक विभागात अनेक सदस्य असू शकतात.
  • प्रत्येक सहभागी रायगड जिल्ह्यातील असावा.
  • ही स्पर्धा फक्त हौशी कलाकारांसाठी आहे.

एक कॉलेज किंवा तालुका एकापेक्षा जास्त क्लबची नोंदणी करू शकतात .

प्रत्येक प्रवर्गातील विजेत्यांना भव्य कार्यक्रमात रोख बक्षिसे आणि चषक प्रदान केले जातील.

सिने सम्राट वेबसाइटवर बाकीच्या टीमची नोंदणी करणारी व्यक्ती टीम लीडर असेल. तो टीम लीडर अपलोडिंग वगैरे सारख्या सर्व कामांसाठी जबाबदार असेल.

मास्टर-क्लास हा ऑनलाइन वर्कशॉप आहे जिथे सिने उद्योगातील तज्ज्ञ चित्रपट निर्मितीविषयी सर्व काही शिकवतील आणि नंतर एक प्रश्नोत्तरांचे सत्र असेल.

नोंदणी केलेल्या टीमचे सर्व सदस्य मास्टर-क्लासला ऑनलाइन उपस्थित राहू शकतील. सर्व टीम सदस्यांना त्यांचे यूजर प्रोफाइल आणि लॉगइन निर्माण करण्यासाठी नोंदणीची पायरी-१ पूर्ण करावी लागेल.

फिल्म क्लब्ज आपला निर्मिती-खर्च वसूल करण्यासाठी आपल्या लघुपटात ‘ईन फिल्म ब्रँडिंग’ करू शकतात. सर्व फिल्म क्लब्जनी आपापल्या लघुपटांचा निर्मिती-खर्च स्वत: करायचा आहे. मात्र लघुपटांचे बजेट रुपये ५०००० फक्त इतके कमाल ठेवणे क्रमप्राप्त आहे.

प्रत्येक फिल्म क्लबसाठी नोंदणी शुल्क केवळ रु. १००० आहे.

अधिक प्रश्नांसाठी, तुम्ही आम्हाला : connect@cinesamrat.com येथे मेल पाठवू शकता किंवा +91 98673 48939 वर व्हॉटस्अप करू शकता.

टीम सिने सम्राटशी संपर्क करण्यासाठी:

इमेलः
connect@cinesamrat.com
आम्हाला येथे मेसेज पाठवा
+91 98673 48939
© Cine Samrat 2022